Disha Shakti

Uncategorized

१८०० किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस व हत्यारासह एकुण ३,६६,५०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त ; श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई.

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, श्रीरामपुर शहरातील मक्का मस्जिद पाठिमागे, वार्ड नं.२ येथील एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची निदर्यतेने कत्तल चालु आहे. आत्ता गेल्यास ते मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलीस पथकास नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोलीस पथक हे पंच व पशु वैदयकीय अधिकारी यांच्यासह ५.३० वा. जावुन खात्री केली असता मक्का मस्जिद पाठिमागे, वार्ड नं.२ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन इसम हे गोवंशीय जनावरचे कत्तल करुन गोवंशीय मांस व कत्तल करण्यासाठी वापरलेली हत्यार व डिजीटल वजन काट्यासह मिळुन आले.

त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानी त्याचे नावे 1) फुरकान अकरम कुरेशी, वय २२ वर्षे, धंदा- मजुरी, रा. मक्का मस्जित पाठीमागे, वार्ड नं. २, श्रीरामपूर 2) जिब्राईल सलीम शेख काकर, वय २३ वर्षे, धंदा- मजुरी, रा. मक्का मस्जित पाठीमागे, वार्ड नं. २, श्रीरामपूर जि. अहमदनगर. असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील गोवंशीय जनावराची कत्तल करुन गोवशीय मांसासह व कत्तल करण्यासाठी वापरलेल्या हत्यार व डिजीटल वजन काटयासह मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1)3,60,000/- रु.कि. चे गोवंशीय जातीचे जनावरांचे कत्तल केलेले मांस अंदाजे 1800 किलो, 200 रु. कि. प्रमाणे, 2) 6500/- एक डिजीटल वजन काटा, तीन लोखंडी सुन्या व एक धार लावण्याची कानस जु.वा.किं. अ. 3,66,500/- रु. एकुण, येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल ताब्यात बाळगता मिळुन आल्याने त्याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 1386/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील पोसई/ समाधान सोळंके, पोहेकॉ / शफिक शेख, पोना/ रघुबीर कारखेले, पोना/भैरवनाथ अडागळे, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकों/ शिवाजी बडे, पोकों/ संभाजी खरात, यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ भैरवनाथ अडागळे हे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!