Disha Shakti

Uncategorized

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार संसदेत कधी बोलताना दिसले नाहीत ; आ. प्राजक्त तनपुरेंची डॉ.सुजय विखेंवर टीका

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : साखर वाटवी का नाही, वाटावी का हत्तीवरून साखर वाटावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असुन सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेमध्ये खासदार विखे बोलताना दिसले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान नगर जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती राज्य सरकार अथवा योग्य त्या एजन्सी मार्फत करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी साखर वाटप सुरू केली असे विचारल्यानंतर, आमदार तनपुरे यांनी कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. त्यामुळे आपण त्यावर बोलणं उचित नाही. पण हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर वाढविण्यासाठी अथवा कांद्याच्या विषयावर संसदेमध्ये बोलताना आपण कधी त्यांना पाहिले नाही व ऐकलेही नाही, अशी टीका त्यांनी करत या संदर्भात त्यांनी संसदेत बोलले पाहिजे असे तनपुरे म्हणाले.

नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये संगणक प्रणालीच्या अद्यावतीसाठी कमी प्रमाणामध्ये पैसा लागत असताना शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला गेला, तर त्याकरता एक नवीन एजन्सी सुद्धा नेमली गेली. वास्तविक हा खर्च २५ ते ३० कोटी रुपयांत झाला असता मग एवढा खर्च कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आता तेथील संचालकांनी आवाज उठवत अनेक गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केली असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या पद्धतीने उधळपट्टी केली जाते व कारभार केला जातो तोच कारभार या ठिकाणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!