Disha Shakti

Uncategorized

दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चांदु गंगाराम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव  : नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील रहिवाशी चांदु गंगाराम गायकवाड वय 55 वर्ष व्यवसाय शेतमजूर यांचा अपघात दिनांक. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. व्यंकट विठ्ठलराव ढगे यांच्या शेतातील काम आटोपून सायंकाळी परत घराकडे पायी चालत येत असताना झाला.

दुचाकी क्रमांक एम.एच 26 बी.जे 4399 या क्रमांकाच्या दुचाकीने कुंटुर फाट्या जवळ मागून त्यांना जोराची धडक दिली. त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.या दुचाकीचा चालक माधव मारोती निरपणे रा.बरबडा ता. नायगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून तो कुंटूर येथे तारतंत्री ( लाईनमेन ) पदावर कार्यरत आहे.या दुचाकी स्वरानी मागून जोराची धडक दिल्याने चांदु गंगाराम गायकवाड यांचा डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.

प्राथमिक उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे दाखल करण्यात आले.परंतु मेंदूला जोराचा मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे हलविण्यात आले. परंतु तेथेही उपचार न झाल्याने, गुरुकृपा हॉस्पिटल नांदेड येथे खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांचावर उपचार चालू होते. त्यांची 5 दिवस मृत्यूची झुंज चालू होती. उपचार चालू असताना अखेर त्यांची प्राणज्योत दि:-28 डिसेंबर 2023 रोजी मालवली.

चांदु गंगाराम गायकवाड, यांना पत्नी, मुले किंवा सूनानातवंडे नसल्याने ते गेल्या 20 वर्षापासून बहिणीच्या घरी मौजे घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड येथे राहत होते. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, यांचे ते मामा होते. दिपक गजभारे यांच्या फिर्यादीनुसार दिनांक. 31 डिसेंबर 2023 रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालक माधव निरपणे यांच्या विरोधात भादवी कलम 279,304-A प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला….


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!