Disha Shakti

Uncategorized

नगर मनमाड महामार्गावरील कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात ; अपघातात दोन तरुण जखमी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.२ जानेवारी २४ रोजी नगर मनमाड महामार्गावरील रोड महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपानजीक  दुपारी  १२  ते १२.३० च्या दरम्यान एक कार दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक तरुणाच्या पायास गंभीर दुखापत झाली असून तर एका तरुणांस जबर मार लागला आह़े. दोन्ही वाहने राहुरीच्या दिशेने जात असताना कारचालक विद्यापीठाच्या पेट्रोल पंपावर वळताना मागील मोटारसायकल कारला येऊन आदळल्याने मोटारसायकल वरील तरुण गंभीर जखमी झाले असून सदरील तरुण राहुरी शहरातील राजवाडा येथील रहिवासी असून त्यातील सोनू गायकवाड नामक तरुणाच्या पायास गंभीर दुखापत झाली आह़े तर साहील जाधव या तरुणही जखमी झाला आह़े.

घटना समजताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा सुपर वायझर कल्याण मेटे, अमोल दिवे व अनिल नजन व सागर पवार हे सुरक्षा कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातग्रस्त तरुणांची मदत करून सदरील तरुणांच्या नातेवाईक व रुग्णवाहिकेस संपर्क करून जखमी तरुणांना नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी मदत करून अडकलेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले सदरील तरुणांना नगर येथील डौले हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आह़े.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!