Disha Shakti

Uncategorized

दत्तात्रय जगदाळे यांची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील पै. दत्तात्रय जगदाळे यांची नुकतीच अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुका उपाध्यक्ष निवृत्ती उर्फ पप्पू कासुटे व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. दत्तात्रय जगदाळे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून कुस्तीमध्ये त्यांचा मोठा नावलौकिक आहे सध्या ते पारनेर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रभागी राहून काम करत आहेत. पोलीस मित्र म्हणूनही ते सध्या कार्यरत असून पारनेर तालुक्यामध्ये युवकांचे मोठे संघटन त्यांच्यासोबत कार्यरत आहे.

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दत्तात्रय जगदाळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे निवडीनंतर दत्तात्रय जगदाळे म्हणाले की अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून व पोलीस मित्र म्हणून काम करत असताना समाजातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील काळात काम करणार आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत आहे.दत्तात्रय जगदाळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी पारनेर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद गायकवाड पत्रकार श्रीनिवास शिंदे, पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गणेश जगदाळे, देसवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदन भोर संपत फटांगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!