विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राज्याला लागलेली भ्रष्ट्राचाराची कीड संपायचे नाव घेत नाहीये. लाचखोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. 2023 साली महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1 हजार 170 आरोपींना ताब्यात घेतले आहे. 803 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिक विभागात दाखल झाले आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या दमदार कामगिरीने नाशकात तब्बल 163 लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरला आहे.
नाशिक पाठोपाठ पुणे विभागात १५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२५ गुन्हे दाखल झाले आहेत. यंदा 70 गुन्ह्यांची वाढ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ विभागांमध्ये लाचखोरी प्रमाण कमी-अधिक आहे. 2023 या वर्षभरात राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. गत वर्षाच्या तुलनेत राज्यभरातील लाचखोरीत 70 गुन्ह्यांची वाढ झाली आहे.
1098 लाचखोर जेरबंद राज्यात एकूण 803 गुन्ह्यात 1170 आरोपींविरोधात लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 4 कोटी 59 लाख 68 हजार 255 रुपयांच्या लाचेची रक्कम जप्त केली आहे. नाशिक विभागात नाशिकसह, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक एसीबीने सहकार, भूमी अभिलेख, महसूल आणि शिक्षण विभागातील लाचखोरीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून सर्वाधिक कारवाया करून 274 लाचखोरांना जेरबंद केले आहे. नाशिक विभागात गत 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 37 लाचखोरीच्या गुन्ह्यांची वाढ झालेली आहे.
नाशिक विभागातील महत्वाच्या कारवाया
भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे व लिपीकावर ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची कारवाई, सिन्नरचे सहायक निबंधक रणजित पाटील व लिपीक विरनारायण यांना २० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जिल्हा निबंधक सतीष खरे यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यावरील कारवाई, शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी व प्रशासनधिकारी सुनिता धनगर यांना 55 हजारांची स्वीकारताना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांचे वर 40 लाखांच्या लाचेच्या मागणी प्रसंगी कारवाई करण्यात आली. नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना घराच्या पार्किंगमध्ये 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आह़े.
Leave a reply