विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमावरून परत येत असतांना शिर्डीचे कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहे. शिर्डीचे शहर कॉँग्रेस अध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर काल रात्री काही अज्ञात हल्ले खोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. तयांच्यावर पाच ते दहा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. यात चौगुले हे गंभीर जखमी झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर ते परत शिर्डी येथे येत होते. यावेळी लोणी गावात हा हल्ला झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच येथील राजकीय वातावरण तंग झाले आहे. संगमनेर तालुक्यातिल आश्वी गावात काल शरद पवार यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. हा कार्यक्रम झाल्यावर सचिन चौगुले हे परत येत होते. त्यांची गाडी ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील राहता तालुक्यातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास आली असता ५ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यात चौगुले यांचे सहकारी सुरेश आरणे हे देखील जखमी झाले आहेत. यानंतर हल्लेखोर पसार झाले.
यानंतर त्यांना तातडीने संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालया बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची दवाखण्यात जाऊन भेट घेतली. तसेच ही घटना भ्याड असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. जर योग्य पद्धतीने कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
सचिन चौगुले यांनी काही महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. दरम्यान, या वरुन चौगुले यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद आता पुन्हा वाढणार आहे.
कॉँग्रेसचे शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला, रॉडने केली बेदम मारहाण

0Share
Leave a reply