विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे बंधू अशोकनाना कानडे यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त नगरपालिकेजवळ लावलेल्या ‘है तयार हम…’ या बोर्डची चांगलीच चर्चा रंगली. कारण या बोर्डवर जणू काही पुढील निवडणुकांसाठी कानडे यांची एक टिमच लढाईसाठी तयार असल्याचे त्यातून दर्शविण्यात आले आहे.
आमदार लहू कानडे यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघात कार्यरत ई असणारे अशोक कानडे यांनी आपल्या संघटन कौशल्याचा जोरावर आपला एक चाहाता वर्ग तयार केला आहे. आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची काम
सुरू आहेत. यशोधन या आमदार जनसंपर्क कार्यालयाची धुराच अशोक कानडे यांच्याकडे आहे. त्यामुळे सतत लोकांमध्ये राहणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. १ जानेवारीला झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याची प्रचिती दिसून आली श्रीरामपूर शहरासह संपूर्ण मतदार संघातील अनेकांनी अशोक कानडे यांना शुभेच्छा दिल्यातयामधे विशेष म्हणजे पक्ष विरहित अनेक पक्षातील नेते मंडळींनी देखील अभिष्टचिंतन केले. मात्र चर्चा झाली ती नगरपालिके समोर लागलेल्या शुभेच्छा फलकाची है तयार हम ..’ या बोर्डाची या फलकावर माजी मंत्री काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आ. डॉ सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ. सत्यजित तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांचे वरती फोटो असून त्या खालोखाल जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी सभापती डॉ वंदना मुरकुटे, ज्येष्ठ नगरसेवक अंजुमभाई शेख, राजेश आलघ, रविंद्र गुलाटी, ज्ञानेश्वर मुरकुटे यांचे फोटो झळकले आणि तयार ‘है तयार हम..’ हा संदेश देण्यात आला.
यामागे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवे-जूने एकत्र करुन संघटात्मक पक्ष बांधणी चालू असल्याचे दिसून येते आणि येणाऱ्या निवडणुकीसह सगळ्या परिस्थितीत आम्ही तयार आहे हाच संदेश दिला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे
Leave a reply