विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : उंदीरगाव ते महांकाळ वाडगाव ला जोडण्यासाठी तसेच श्रीरामपूर वैजापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला महांकाळ वाडगाव येथील या पुलाला जोडण्यासाठी अत्यावश्यक असणारा उंदीरगाव ते महांकाळ वाडगाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूर्दशा झाली असून या रस्त्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपये निधी लवकरच देणार असल्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महांकाळ वाडगाव येथील रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते नंदू चोरमल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे तालुकाध्यक्ष दिपक अण्णा पटारे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने आदी मान्यवर उपस्थित होते. खानापूर – महाकांळ वाडगाव ते सराला ( प्र.जि .मा. ६ ) कि.मी.३२ ते ४२. ६०० या रस्त्याचे डांबरीकरणासाठी सुमारे ५ कोटी ७० लक्ष निधीच्या कामाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले रस्ते हे ग्रामीण भागाचा आत्मा असुन राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार असुन शासनाने अनेक सर्वसामान्य नागरिकाना प्राधान्य देऊन महत्वकांशी योजना राबविल्या असुन यापैकी राज्यातील गोरगरीबांना वाळू ६०० रु ब्रास प्रमाणे भेटायला लागली मात्र याचा अनेकांना त्रास होत आहे. वाळूचे हे धोरण सर्वांसाठी फायदेशीर असुन आपल्या भागात देखील राबविण्याची गरज असल्याचे मत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अविनाश कुलकर्णी, विठ्ठल सोमवंशी, शशीराज वानखेडे, शिवाजी बडाख, भाऊसाहेब विठ्ठल चोरमल, नंदू मामा चोरमल, गोकुळ खुरुद, चेअरमन, भगवान जाधव, लक्ष्मण दातीर ,प्रकाश दहिटे, मधुकर खुरूद, उपसरपंच नानासाहेब वानखेडे, कचरू महांकाळे, राहुल दातीर, जमादार शेख, सोमनाथ आव्हाड, दत्तू भाऊ चोरमल, रवींद्र कुलकर्णी, नाथा बाबा खुरूद, केशव बडाख, रंगनाथ खुरुद ,औदुंबर वानखेडे, रघुनाथ दातीर, अशोक कारले, आसिफ बेग, नुराभाई पठाण, गोकुळ जाधव, गणेश बिडवे ,नजीर शेख,इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
महांकाळ वाडगाव पुल ते उंदीरगाव रस्त्यासाठी १० कोटीचा निधी देणार – नामदार राधाकृष्ण विखे पाटील

0Share
Leave a reply