प्रतिनिधी / गणेश राशीनकर : दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल ठोंबरे व उपाध्यक्ष ऍड.श्री अमोल रंजाळे व विश्वस्त सभासद अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र नांदूर यां ठिकाणी फुलांच्या रोपाचे वृक्षारोपण सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
यावेळी सर्व स्वामी सेवेकरी नांदूर ता.राहाता जि. अहमदनगर यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. मुखी साखरेचा गोडवा असावा मनी कुणाचा कधी द्वेष नसावा,जोडावी माणसे, जपावी नाते विसरून व्यवहारी, फायदे तोटे ! क्षणांचे मणी, अलगद ओवावे, आनंदी सुरांनी, मनास छेडावे.!! श्री स्वामी समर्थ केंद्र नांदूर या ठिकाणी वृक्षारोपण केल्याबद्दल सेवेकरी यांनी संस्थेचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच श्री स्वामी समर्थ, सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त केले.
दक्ष स्वयंसेवक फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र नांदूर येथे वृक्षारोपण संपन्न

0Share
Leave a reply