विशेष प्रतिनिधी (पारनेर) / वसंत रांधवण : प्रभु श्री राम यांच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पारनेरमध्ये गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी जाहीर निषेध नोंदवत पारनेर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदरच्या निवेदनात प्रभु श्रीराम हे अखंड भारतवासियांचे दैवत असल्याचे स्पष्ट करत या दैवताबाबत जितेंद्र आव्हाड यांनी लाजीरवाणे वक्तव्य करत भारतवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे नमुद करुन संबंधित प्रकार हा अतिशय निंदनीय व लाजीरवाणा असल्याचे निवेदकांनी म्हटले आहे. ह्या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही प्रशासनाकडे संबंधित निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यासह पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, स्वप्निल औटी, पठार भागाचे युवा नेते अर्जुन नवले, अमोल मैड, ओंकार मावळे, चंद्रकांत कोल्हे, शंकर कोल्हे, आप्पासाहेब फडके उपस्थित होते.
Leave a reply