Disha Shakti

सामाजिक

नेवासा मुले शाळेतील शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थी, शिक्षक अनं पालक झाले भावूक

Spread the love

अ.नगर जिल्हा प्रतिनिधी / शेख युनूस : शिक्षकाने लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण करत सहकाऱ्यांच्या मदतीने बदललं शाळेचे रूपडे, शाळा केली डिजिटल स्कूल आणि उभारला स्मार्ट टू ग्लोबल क्लास नेवासे शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक नेवासा खुर्द मुलांच्या शाळेत स्मार्ट टू ग्लोबल क्लासची निर्मिती व मिशन डिजिटल स्कूल साठी महत्त्वपूर्ण योगदान व मिशन आपुलकी आणि लोकसहभागातून शाळेच्या भौतिक सुविधांचा कायापालट करणाऱ्या अवलिया शिक्षक राहुल आठरे यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय शिक्षकाची बदली झाल्याने निरोप देताना गावातील विद्यार्थ्यांसह पालकांना, सहकारी शिक्षकांना देखील अश्रू अनावर झाले.

उपक्रमशील शिक्षक राहुल आठरे यांची पदवीधर शिक्षक पदोन्नतीने नेवासे तालुक्यातील भालगाव येथे बदली झाल्यामुळे निरोप व शुभेच्छा समारंभाचे आयोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व पालक यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप, अधीक्षक विश्वनाथ धिंदळे, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सिंधुताई खताळ – नलभे, शकीला खान,भालगावचे सरपंच दादासाहेब खरात, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदेश ठोळे, पत्रकार सुहास पठाडे, न्यूज प्रतिनिधी शंकर नाबदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक आठरे, शोभा आठरे, शिक्षिका शितल झरेकर-आठरे आदि मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक आठरे यांनी नेवासा मुले शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन याच शाळेत पुन्हा आंतरजिल्हा बदलीने गेल्या सहा वर्षांपूर्वी हजर झाले होत, शाळेची जोडलेली एक नाळ व स्थानिक जनसंपर्काच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक गरजा ओळखून शाळेचे रूपडे पालटण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना, दानशूर व्यक्तींना आवाहन केले. यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे घेऊन “मिशन डिजिटल स्कूल” हा प्रोजेक्ट त्यांनी सहकारी शिक्षकांना सोबत घेत सुरू केला. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणासाठी तब्बल सात स्मार्ट टीव्ही मिळवले, इतकेच नाही तर विविध योजनेतून शाळेस संगणक, प्रिंटर, विद्यार्थ्यांच्या डिझिटल शिक्षणासाठी पदाधिकारीच्या सहाय्याने दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल, खेळणी साहित्य मिळवण्यासाठी पाठपुरावा करत प्रयत्न देखील केले.
याशिवाय ग्लोबल नगरी

फाउंडेशन अमेरिका व इतर स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत विविध जीवनाभिमुख उपक्रमांच्या व स्पर्धा परीक्षेतील यशाद्वारे शाळेची पटसंख्या वाढवली. शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेत समग्र शिक्षा व जिल्हा परिषद अहमदनगरच्या सोशल मीडिया हँडलवर आणि अहमदनगर आकाशवाणी केंद्राच्या बालमेळा कार्यक्रमांतर्गत शाळेच्या सात व जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले.जिल्हा परिषदेच्या शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी त्यांनी तन मन धनाने कार्य करत स्वतःला झोकून देत आलेल्या अडचणींचा सामना करत समाजप्रिय, विद्यार्थी प्रिय शिक्षक बनल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यासाठी त्यांना सर्वांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत एक लक्ष रुपयापेक्षा अधिक लोकसहभाग मिळून शिक्षक आठरे यांनी उभारलेल्या “स्मार्ट टू ग्लोबल क्लास” व केलेल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. यावेळी आदित्य कोतकर, संचित ठोळे, समर्थ शिंदे,आरिष बागवान, कैवल्य आरले या वर्गातील विद्यार्थ्यांनी सांगितलेले हृदयस्पर्शी अनुभव व मनोगतातून विद्यार्थी व पालकांना गहिवरून आले.

यावेळी शिक्षक साईनाथ वडते यांनी कवितेतून सहकारी शिक्षक आठरे यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत उपस्थित भावुक होत सर्वांचे डोळे पाणवले.यावेळी भालगावचे सरपंच दादासाहेब खरात, सिंधुताई नलभे, पालक अशोक डौले, उद्योजक संदेश ठोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अण्णासाहेब शिंदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अरविंद घोडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रतिभा पालकर, विद्या खामकर, प्रतिमा राठोड, अश्विनी मोरे, ज्योती गाडेकर, मीनाक्षी लोळगे,अर्चना बोकारे यांनी प्रयत्न केले तर पालक जालिंदर गवळी, किशोर आरले, उमेश शिंदे, अक्षय टेकाळे, अरुण कोल्हे, इंजिनिअर कौस्तुभ शिर्के,पालक वैष्णवी डमाळे, मोनिका शिंदे,पूजा गवळी, रुकसाना बागवान, सोनाली पारखे आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना मिष्ठान भोजन देण्यात आले.

डिजिटल शिक्षणाची वाट धरत, उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लोक सहभागातून भौतिक सुविधा निर्माण करत शिक्षक राहुल आठरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या शाळेचा विकास कौतुकास्पद आहे. मिशन आपुलकी अंतर्गत उभारलेल्या स्मार्ट टू ग्लोबल क्लास व मिशन डिजिटल स्कूल प्रकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
– शिवाजी कराड,गटशिक्षणाधिकारी पं. स.नेवासे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!