Disha Shakti

इतर

पोलीस पाटील भरतीच्या अर्जासाठी आवश्यक प्रमाणपत्रे शनिवार व रविवारी मिळण्याची सुविधा ; उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : पोलीस पाटील भरती-2023 चे अनुषंगाने जाहिरात प्रसिध्द झाली आहे. या जाहिरातीनुसार पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 ते 8 जानेवारी 2024 असा आहे. इच्छूक पात्र उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रमाणपत्राची अडचण भासू नये यादृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येत्या शनिवार व रविवारी सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयाचे कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (इडब्लूएस) प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहीवासी प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रे मिळणे सोयीचे झाले आहे.

यासाठी उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांनी उमेदवारांना पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी 6 व 7 जानेवारी 2024 या शनिवार व रविवार या दिवशी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे कामकाज सुरु राहील यांची दक्षता घ्यावी. तसेच पोलीस पाटील पदासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव प्रथम प्राध्यान्याने हाताळावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांनी दिले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!