Disha Shakti

इतर

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य सरकार वाटा रूपये 750 कोटींची मान्यता

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : दिनांक 04/01/2024 रोजी डॉ हेडगेवार चौक नायगाव या ठिकाणी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य सरकार वाटा रूपये 750 कोटीस मान्यता देण्यात आली. ही आनंदाची बातमी ऐकताच नायगाव भाजपा कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने फटाके फोडून घोषणाबाजी करत जलोष करण्यात आला याबद्दल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व तसेच मा.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे आभार या प्रकल्पासाठी सातत्याने 5 वर्ष पाठपुरावा करून मंजूर केल्या बद्द्ल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे विशेष आभार तसेच नायगाव व नरसी मध्ये फटाके फोडून केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारचे नायगांव विधानसभा मतदारसंघातील सर्व नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने यांनी आभार व्यक्त केले.

तसेच सोबत उपस्थित मा.श्री.श्रावण पाटील भिलवंडे मा शिवराज पाटील होटाळकर, मा बालाजी बच्चेवार, मा.भगवान पाटील लंगडापुरे, साहेबराव पाटील गोळेगावकर, हरिचंद्र पाटील चव्हाण शिवाजी पाटील वडजे, धनराज शिरोळे, रणजित देशमुख, शिवाजी पाटील ढगे, व्यंकट पाटील चव्हाण, जीवन पाटील चव्हाण, गोविंद पाटील डाकोरे, नंदू पाटील बेंद्रिकर, विकांत पाटील पवळे, प्रदीप सावकार देमेवार, भाऊराव पाटील होटाळकर, शंकर वडपत्रे, संभाजी पोटफोडे, विलास पाटील धुपेकर, श्रीकांत पाटील शिंदे, राजू सोनकांबळे, दत्ता पाटील नारे व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!