अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक विरुद्ध राजकीय पक्ष असा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण राजकीय पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षाने पोलिस अधीक्षक पक्षपाती असल्याचा आरोप करत थेट राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले आहे. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएमआय) पक्षाचे पदाधिकारी नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यपद्धती विरोधात आक्रमक झाले आहेत.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी राज्याचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहून राकोश ओला हे सरकारच्या जवळ असलेल्या जातीयवादी संघटनांना बळ देत असून, यातून नगर जिल्ह्यात जातीय दंगली वाढल्याचे पत्रात म्हटले आहे. या तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास न्यायालयीन लढा लढणार असल्याचा इशारा डाॅ. परवेज अशरफी यांनी पत्राद्वारे दिला आहे. या पत्रात राकेश ओला यांनी नगर जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यापासून वाढलेल्या जातीय तणावाच्या घटनांचा तपशीलाची माहिती दिली आहे.
पालकमंत्र्यांवर निशाणा
नगरचे पालकमंत्री यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला काम करत आहेत नगर जिल्ह्यातील जातीयवाद संपवण्यासाठी कार्यक्षम पोलिस अधीक्षकांची गरज आहे, असे म्हणत राकोश ओला यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ असल्यास कारणांसह खुलासा करण्याची मागणी डाॅ. परवेझ अशरफी यांनी पत्रात केली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक आयोग, नगर जिल्हाधिकारी, एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असद्दुद्दिन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना देखील हे पत्र पाठवण्यात आले आहे.
अहमदनगरचे पोलिस अधीक्षक विरुद्ध राजकीय पक्ष वाद पेटणार ; राकेश ओला पक्षपाती असल्याचे ‘एमआयएम’चे महानिरीक्षकांना पत्र

0Share
Leave a reply