ठाणे प्रतिनिधी / किशोर खामगळ : झेप प्रतिष्ठानतर्फे आज दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी मुरबाड येथील आदिवासी कातकरी समाजातील नांदगाव झुगरेवाडी येथील शाळा दत्तक घेण्यात आलेली आहे. या शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, लायब्ररी, UPS/MPSC कक्ष, मुला मुलींसाठी शौचालय, पुस्तके, वह्या, क्रीडा साहित्य, शाळेसाठी डिजिटल painting, मेडिकल कँप आणि विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेतील मुलांना 4 कॉम्प्युटर देण्यात आले. मुलींचा हस्ते याचे उद्घाटन करून हे संगणक मुलांना उपलब्ध करून देण्यात आले.
या शाळेच्या आणि शाळेतील मुलांच्या संपूर्ण विकासासाठी आपण सर्व मेहनत करूया आणि मुरबाड मधील मोफत शिक्षण देणारी सर्वोत्तम शाळा बनवण्याचा मानस आहे.. त्यात तुम्हा सर्वांच्या सहभागाची आणि आशीर्वादाची गरज आहे.
आपलाच,
विकास धनवडे
(झेप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)
9700712020,_www.zeppratishthan.org
HomeUncategorizedझेप प्रतिष्ठाण तर्फे झुगरेवाडी येथील शाळा दत्तक घेऊन नवीन वर्ष नवीन अध्यायास सुरवात
Leave a reply