Disha Shakti

सामाजिक

दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेच्यावतीने पत्रकार जावेद शेख सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर  सुरशे : आज ०६ जानेवारी ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधुन दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्था, ता.नेवासा, जि. अहमदनगर यांच्यावतीने पत्रकारितेत उत्तम कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सन २०२३-२४ शनिवार दि.६ /१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरचे तहसीलदार श्री.संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कै.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समिती, शेतकरी भवन, अ.नगर येथे संपन्न झाला. सामाजिक राजकिय सांस्कृतिक कार्यात पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पत्रकार दिना निमित्त पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार श्री.संजय शिंदे, एम.आ.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शिशीरकुमार देशमुख, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेमदान, कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव बार असोसिएशनचे उपअध्यक्ष ॲड.श्री.महेश शेडाळे जिल्हा सचिव दै.पराक्रमी संजय वायकर आदी. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी दै.साईसंध्या व दै.पुणे वैभव तसेच दै.हिंदू सम्राटचे राहुरी तालुका प्रतिनिधी  आभ्यासू, सजग, लोकशाहीचा चौथा स्तंभाच्या माध्यमातून आपली भूमिका सडेतोड मांडून शेवटच्या घटकाला आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी कायम धडपडणारे पत्रकार जावेद शेख यांना पत्रकारितेत, सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक कार्यात  पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सन २०२३-२४ करीता सन्मानित करण्यात आले.

दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, उपाध्यक्ष शारदा मुंगसे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळपुंड, नाना भोरडे, गौरी भोस, ऐश्वर्या पवार, सुनिता भाकरे , रेखा नवसे, मिरा पडळकर , मच्छिंद्र ढाकणे, प्रतीक ठोंबे , तुषार धावडे, अभिषेक चौघुले, अल्तमश शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सबिल सय्यद यांनी केले तर शहादेव मुंगसे यांनी आभार व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!