पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : देशभरात आयोध्येतील भव्य मंदिरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असताना आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात साखर वाटपातुन प्रभु ‘श्रीरामाचा’ जयघोषा बरोबर घराघरात पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे समाधान वाटत असल्याचे तास व वनकुटे ग्रामस्थांना मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामार्फत असून रेशन कार्डधारकांना मोफत डाळ वाटप करण्यात आली.
यावेळी बोलताना भास्कर शिंदे म्हटले की सर्व गोरगरीब जनतेने आपल्या घरीच गोड नैवेद्य करून रामासअर्पण करावे व घरातील सर्व कुटूंबानी सेवन करावे या दिवशी सडा रांगोळी टाकून मेणबत्ती पेटवून सण साजरा करावा. तसेच या वेळी ढवळपुरी गटाचे बंडूशेठ रोहकले, राहुल विखे (पी.ए), राहुल पाटील शिंदे (भाजप तालुका अध्यक्ष), बाबा शेठ खिलारी, सुभाष दुधावडे (खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष), गंगाराम रोहकले, शिवाजी खिलारी (माजी सरपंच टाकळी ढोकेश्वर) , भास्करराव शिंदे (माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य), गणपत काळणर, रामदास लेंभे, निवृत्ती बागुल, संतोष काळणर, तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply