श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : श्रीरामपुरातील येथील विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडलाअसून लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबरी कसली आहे. मेळावे घेत लोकसभेच्या निवडणुकीच्या तयातीला वेग दिला जातोय. शिर्डीची जागा जिंकायचीच, असा चंगच ठाकरे गटाने बांधला आहे. त्यासाठीच श्रीरामपूर येथील विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.
सरचिटणीसांची रणनीती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात सर्व महाराष्ट्र आपल्या परिवाराप्रमाणे सांभाळला. त्यांच्या आजाराच्या वेळेस ज्या-ज्या गद्दारांनी गद्दारी केली, त्यांना पाडणे हेच आपले कर्तव्य आहे. पक्षप्रमुखांचे हात मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा आणि प्रत्येक भागामध्ये शिवसेनेची पुनर्बांधणी करावी. शिवसेना आज शेतकऱ्यांसाठी हा एकमेव पक्ष काम करत असल्याने शिवसेनेकडून सर्व समाजाला मोठ्या आशा आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सांगितले.
माजी खासदार वाकचौरे म्हणाले, “शिवसेनेचा खासदार असताना मतदार संघामध्ये आपण केलेल्या कामाचे श्रेय आजचे लोकप्रतिनिधी घेत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सन्मानाने पक्षात घेऊन शिर्डी लोकसभेमध्ये काम करण्याची सूचना केली आहे”. शिवसैनिक हा कधीही कोणती अपेक्षा न करता स्वखर्चाने पक्षाचे काम करत असतो. कितीही परिस्थिती विरोधात गेली तरी ते आपले आचरण आणि पक्ष याच्या विरोधात कधीही जात नाही. त्यामुळे मी स्वगृही आलो, असेही माजी खासदार वाकचौरे यांनी म्हटले.
माजी आमदार कांबळे यांनी आमदारकीच्या वेळेस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे-जे शब्द आपणास दिले, ते त्यांनी पाळले. त्यामुळे पक्षप्रमुख ज्याला उमेदवारी देतील त्याचे निष्ठेने काम करेल, असे सांगितले. सचिन बडदे यांनी सध्या तरी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाबरोबर घेऊन सर्व मतदारसंघात फिरा आणि येणाऱ्या लोकसभेला शिर्डी मतदार संघामध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवा, असे शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.महेश क्षीरसागर, सदा कराड यांची भाषणे झाली. उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख लखन भगत, राधाकिसन बोरकर सुहास वहाडणे, सचिन म्हसे, सोमनाथ गोरे, रमेश घुले, निखील पवार, सदाशिव पटारे, किशोर ढोकचौळे, एकनाथ गुलदगड, शारदा कदम, कल्पना वैद्य, संदीप पोखरे, बच्चू बडख, शिवाजी सिनारे आदी यावेळी उपस्थित होते.
Leave a reply