Disha Shakti

सामाजिक

प्राध्यापक मनोजकुमार जाधव राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक 2023 पुरस्काराने सन्मानित

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय राहुरी, येथील प्राध्यापक प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा पहिला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सोलापूर येथे आयोजित दिनांक 30,31 डिसेंबर 2023 रोजी भरलेल्या पहिल्या इतिहास परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एस.व्ही.सी.एस. शिक्षण संस्थेच्या संकुलात हा मानाचा पुरस्कार श्री.दत्तात्रय मुळे (प्रदेशाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशन) यांच्या शुभहस्ते व काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत समारंभपूर्वक कार्यक्रमात सन्मानाने प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांना प्रदान करण्यात आला.

समाजासाठी कृतार्थ भावनेने, अतुलनीय व अद्वितीय अशा कार्यकर्तृत्वातून मानवतेच्या उद्धारासाठी व शाश्वत विकासाच्या दृष्टीने केलेल्या कार्याबद्दल तसेच त्याग, सेवा, सामाजिक न्याय व अपेक्षित परिवर्तनासाठी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मानाच्या पहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे असून

प्राध्यापक जाधव यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर  त्यांचे  राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा- सौ.प्रभावतीताई सतीश बिहानी, सचिव – श्री. मनोजशेठ बिहानी, सहसचिव- श्री.अनुपशेठ बिहानी यांनी अभिनंदन केले. याबरोबरच महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य-श्री.कैलास अनाप(सर) यांनी देखील अभिनंदन केले. प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!