Disha Shakti

सामाजिक

माजी मंत्री, जिल्हा बँकचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्याकडून राहुरीतील पत्रकार सन्मानित

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी शहरात पत्रकार दिनानिमित्त राहुरीतील आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणाले की पत्रकार हा निपक्ष, निर्भीड असून तो बातमी करण्यासाठी कुठलाही विचार न करता समाजातील न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असतो.

समाजात पत्रकारांचा विश्वास कायम आहे. कुठलीही बातमी करण्याचं काम हे कष्टाचे आणि मेहनतीचे आहे. प्रत्येक पत्रकाराची आर्थिक परिस्थिती सारखी नसते काही पत्रकार शेती व्यवसाय करून पत्रकार समाजात चांगली भूमिका पार पाडण्याचे काम करतात. दरवर्षी न चुकता पत्रकारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमचा एकच पक्ष आहे. सध्या आम्ही नगर जिल्ह्यात अनेक कार्यक्रमात एकत्र फिरतो आमचं सगळं अलबेल पाहून काहींना दुःख होत. आमचं कधी बिघडेल आणि त्यांचं कधी फावेल यावर काही लक्ष ठेऊन असल्याचा टोला माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी नांव न घेता लागवला आहे.

यावेळी नामदेव ढोकणे, उत्तमराव म्हसे, आर. आर. तनपुरे, सुरेश बानकर, मनोज कुलकर्णी, सुभाष गायकवाड, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, कृष्णा राजदेव, रवींद्र म्हसे त्याच प्रमाणे तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!