कर्जत प्रतिनिधी / भगवान पाटील : वायसेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्यावतीने किलबिल बाजार भरविण्यात आला होता. या आनंदी बाजाराच्या माध्यमातून या शाळेत मुलांना व्यवहारिक नॉलेज व माहितीसाठी या शाळेतील शिंगाडे मॅडम आणि शिक्षक श्री.कडेकर सर यांनी मुलाना व्यवहारिक माहिती या साठी शाळेत सर्व मुलांना बाजार भरवण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले असता विद्यार्थ्यांनी या सूचनांचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या सहाय्याने आनंदी व किलबिल बाजार भरवला होता.
यामध्ये मुलानी फळे, पालेभाज्या आणि इतर खाण्याचे पदार्थ, खेळणी बाजारामध्ये विक्रीसाठी शाळेत ठेवण्यात आले होते. या किलबिल बाजाराचा गावातील लोकानी सहभाग घेऊन या बाळ गोपाळ यांनी भारवलेला बाजार पाहून खूप आनंदी झाले अणि त्यांच्या कडून खरेदी करून त्यांना व्यवहारिक माहिती दिली आणि अश्या प्रकारे हा आनंदी बाजार उत्साहात पार पडला यासाठी शाळेतील शिक्षक व पालक व गावकरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
Leave a reply