दिशाशक्ती न्यूज : दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल ठोंबरे पाटील ,उपाध्यक्ष श्री.ऍड.अमोल रंजाळे, संस्थेचे विश्वस्त श्री ऍड.अजय मूर्तडक, श्री.अमोल लेंडे, श्री.दिपक शेळके, श्री विशाल गोरे, श्री ऍड. प्रकाश बेंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आज मकर संक्राती सणाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र साक्री रोड, गणेश कॉलनी, धुळे या ठिकाणी फुलांच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत,या रूढी पंरंपरा यांना फार महत्व असतं त्याचंबरोबर गुढीपाडवा, दिपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकरसंक्रांत!! “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” हे म्हणत संक्रात साजरी केली जाते.तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी.
केंद्रामध्ये “वसुंधरा हेच जीवन” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन फुलाच्या रोपाचे वृक्षारोपण केले.यावेळी गणेश कॉलनी मधील सर्व स्वामी सेवेकरी उपस्थित होते सर्वांनी खूप छान प्रकारे सहकार्य केले. सर्वांचे मनस्वी आभार.. श्री स्वामी समर्थ.
Leave a reply