Disha Shakti

क्राईम

भावाला शिवीगाळ केल्याचा रागातून मकरसंक्रांतीच्या दिवशी चाकूने भोसकून युवकाचा खून

Spread the love

विशेष बातमी / इनायत अत्तार : नगरमधील कल्याण बायपास येथी एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी घडली आहे. दोन तरुणांमधील वादानंतर हा प्रकार घडला आह़े. मकर संक्रांतीच्या दिवशी नगर शहरात मध्ये दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यातूनच एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. शहरातील कल्याण बायपास या परिसरात हा प्रकार घडला.

भावाला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका युवकाने दुसऱ्या युवकावर चॉपरने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी हा प्रकार घडला. शुभम अशोक सोनवणे (वय- २४, राहणार चेतना कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून बंटी उर्फ किरण प्रकाश पाडोळे राहणार दूध डेरी चौक याचा भाऊ रोहित पाडोळे हा सोमवारी सायंकाळी एमआयडीसीतील दूध डेरी चौकात चिकन दुकानात चिकन आणण्यासाठी गेला होता. तेथे असलेल्या शुभम सोनवणे सोबत त्याचे वाद झाले याची माहिती रोहितने आपला भाऊ बंटी पाडोळे याला दिली. बंटी यांनी चाकूसोबत घेऊन जात शुभम कडे गेला आणि रोहित सोबत वाद घालून त्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरत बंटीने शुभम सोनवणेवर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

जखमी शुभम सोनवणे याला स्थानिकांनी विळद घाटातील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे त्याला डॉक्टरने मृत घोषित केले. मारहाण करणारा बंटी पाटोळे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी रुग्णालयात धाव घेतली, याप्रकारे रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती , अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!