विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : कोपरगाव शहरातील उपनगर खडकी भागामध्ये दिनांक 14 जानेवारी रविवार 2024 रोजी दुपारनंतर साडेचार च्या दरम्यान धार्मिक स्थळी दोघा आरोपींनी प्रवेश करून पैकी एका आरोपीने परिसराची पाहणी केली व तदनंतर दुसऱ्याने प्रवेश करून पवित्र धर्मग्रंथ घेऊन विटंबना करण्यात आली सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की दुपारच्या नमाज पठण नंतर धार्मिक स्थळांमध्ये एक वयोवृद्ध भाविक आराम करीत होते त्यांची नजर चुकून एक आरोपीने परिसराची संपूर्ण पाहणी केली व दुसऱ्या आरोपीला मध्ये पाठवले व पवित्र धर्मग्रंथ घेऊन पोबारा करण्याचे उद्देशाने बाहेर पडला परंतु परिसरामध्ये राहणारे अरबाज शाकीर शेख या व्यक्तीकडे पेन मागितला असता अरबाज यास पिशवीत असलेला धर्मग्रंथ निदर्शनास आला त्याने इतर भाविकांच्या मदतीने तात्काळ आरोपीस पकडून धार्मिक स्थळी आणले व संबंधित ट्रस्टी यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
ट्रस्टी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे फौज फाटा घटनास्थळी हजर झाले प्रार्थना स्थळाच्या सर्व बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून त्यामध्ये सदर आरोपी कॅमेरात कैद झालेला आहे त्याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे सदर आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले व दुसरा आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला परिसरामध्ये मुस्लिम समाज आक्रमक झाले होते व तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी व ट्रस्टी यांनी वेळीच जमावला शांत केले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर आरोपीने त्याचे नाव सुनील अरुण दाभाडे वय वर्ष 24 राहणार बोकटे तालुका येवला जिल्हा नाशिक असे सांगितले व दुसरा आरोपी नवनाथ भागवत असे सांगितले.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी अरबाज शाकीर शेख यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 295 अ 379 504 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्याकडे दिला असून तपासाची वेगवान चक्र फिरवले असल्याची माहिती पोलिसांकून मिळाली तसेच पोलीस उपधीक्षक शिर्डी संदीप मिटके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शक सूचना केल्या
रात्री उशिरा अहमदनगर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व समाज बांधवांना शांततेची आव्हान केले व दुसऱ्या आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल व यामागील सूत्रधार कोण आहे याची पोलीस माहिती घेतील असे अवगत केले दिनांक 14 जानेवारी रोजी खडकी परिसरामध्ये पोलीस छावणीचे स्वरूप आले होते कारण यामागे सुद्धा तालुक्यामध्ये कोळगाव थडी येथे अज्ञात समाजकंटक यांनी पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केली होती त्यामुळे समाज बांधव आक्रमक झाले होते व शहर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने तरुण वर्ग व समाज बांधव उपस्थित होते. यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की या घटनेमागील सूत्रधार कोण आहे व कोपरगाव शहरात अशांतता घडवण्याचा जो प्रयत्न करत असेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मशिदीचे मुख्य ट्रस्टी मौलाना अली अन्सारी ट्रस्टी पत्रकार रहीम खान पठाण चांद भाई शेख सलीम भाई लकडी वाले अमजद शेख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दीपक जपे पाटील सामाजिक कार्यकर्ते निलेश डोके पाटील कैलास सोमासे पाटील व इतरही हिंदू समाज बांधव उपस्थित राहून समाज बांधवांना शांततेची आव्हान केले. आत्तापर्यंत कोपरगाव तसेच खडकी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या गुण्या गोविंदाने राहत असून कोणी गालबोट लावीत असेल तर पोलिसांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी केली व जमावाला शांततेचे आव्हान केले
कोपरगाव येथे धार्मिक स्थळी प्रवेश करून पवित्र धर्मग्रंथाची विटंबना माथे फिरूंचा पराक्रम

0Share
Leave a reply