तेर प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव शहरातील श्री.संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तेर ता. धाराशिव येथील पद्माकर भगवानराव फंड, उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन तुकाराम भोसले, सचिवपदी रत्नदीप अरुणराव वाकुरे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.
धाराशिव शहरातील श्री संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1972 मध्ये झालेली असून या संस्थेचे तेरणा पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची मराठवाडा विभागातील पहिली निवासी शाळा आहे. शेतकऱ्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकावीत, या हेतूने ही शाळा काढण्यात आली. दी.13 जानेवारी रोजी मुदत संपल्याने संस्थेच्या पदाधीकारी यांच्या बिनविरोध निवडी झाल्या. यामध्ये अध्यक्षपदी पद्माकर फंड, उपाध्यक्षपदी नितीन भोसले, सचिवपदी रत्नदीप वाकुरे, सहसचिवपदी पृथ्वीराज पद्माकर फंड, कोषध्यक्ष संजय लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तेर येथे पद्माकर फंड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंडितराव डोंगरे, पानवाडीचे पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील, तेर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश कदम, ग्रामपंचायत सदस्य अजित कदम, अक्षय उंबरे आदी उपस्थित होते.
धाराशिव येथील श्री. संत गोरोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तेरचे पद्माकर फंड ; नितीन भोसले उपाध्यक्ष तर सचिवपदी रत्नदीप वाकुरे

0Share
Leave a reply