धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : शिवसेना पक्ष फुटीनंतर पक्षात अनेक नविन नियुक्त्या झाल्या आहेत . अशा सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाची संघटन बांधनी कळावी यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने गुरुवार १८ जानेवारी रोजी राजे कॉम्प्लेक्स धाराशिव येथे संघटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन यात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे .
कुठलाही राजकिय पक्ष घेतला तर ज्याचे संघटन खंबीर तोच वरचढ ठरतो . यामुळेच महाराष्ट्रात हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली संघटना वरचढ ठरली. गद्दारांच्या फुटीनंतर पक्षात अनेक नविन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या झाल्या .या सर्वांना शिवसेनेचे बाळासाहेबांचे संघटनबाबत काय निर्देश होते व संघटना कशी मजबुत झाली.
भविष्यात संघटन कसे करावे याची माहिती व्हावी म्हणुन शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव तालुकाप्रमुख सतीषकुमार सोमाणी व शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी पक्षश्रेष्टीच्या आदेशाप्रमाने गुरुवार १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजे कॉम्प्लेक्स धाराशिव येथे संघटन कार्यशाळेचे आयोजन केले आहे .
या कार्यशाळेत धाराशिव लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , जिल्हाप्रमुख तथा लोकप्रिय आमदार कैलास घाडगे- पाटील , जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे , धाराशिव विधानसभा संपर्क प्रमुख अरुण नारकर , सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर , सहसंपर्क प्रमुख शंकररावजी तात्या बोरकर यांचे मार्गदर्शन होणार आहे . या संघटन कार्यशाळेस धाराशिव तालुक्यातील उपतालुका प्रमुख , विभाग प्रमुख , शाखा प्रमुख, गणप्रमुख, युवा सैनिक, बुथ बीएलओ , शिवसैनिक व मुळ शिवसैनेवर प्रेम करणाऱ्या नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन तालुकाप्रमुख सतीषकुमार सोमाणी व शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले आहे.
Leave a reply