बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार मिशन आयोध्या,मंदिर स्वच्छता अभियान 14 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत सर्व मंदिरे व धार्मिक स्थळाची स्वच्छ करावे असे आव्हान करण्यात आले होते. त्यांचा आव्हानाला प्रतिसाद देत बिलोली तालुक्यातील मौजे-बोरगाव थडी हनुमान मंदीर तसेच बिजुर येथील महादेव मंदिर पूर्ण परिसर साफसफाई करण्यात आले. आणि केर कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आले तसेच महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे/चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य मा.लक्ष्मणराव ठक्करवाड, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, आबारावजी संगनोड जिल्हा सरचिटणीस ओबीसी,राजेंद्र रेड्डी तोटावाड. जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती, संदीप पाटील रामपुरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, बालाजीराव देशमुख तालुका संयोजक विश्वकर्मा योजना, गोविंद पाटील शिंदे किसान मोर्चा ता उपाध्यक्ष,आनंद महाराज तालुका अध्यक्ष आध्यात्मिक आघाडी, गोविंद शिनगारे, दिगांबर पाटील शिनगारे चेअरमन, नागनाथ शिनगारे, बाबुराव कुटूंरे, शंकरराव शिनगारे, देवराव भेलोंडे, भाजपा पदाधिकारी महिला बगीनीचा ग्रामस्थ मंडळीचा सहभाग होता.
मिशन आयोध्या,मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत बोरगांव थडी व बिजुर येथे मंदिर येथे ग्रामस्थांनी राबविले स्वच्छता अभियान

0Share
Leave a reply