Disha Shakti

सामाजिक

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे    : राहुरी पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा राहुरी तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा संघाच्यावतीने सत्कार संपन्न करण्यात आला.यावेळी यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, जिल्हा निमंत्रक राजेंद्र म्हसे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, तालुका सचिव रमेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख मधुकर म्हसे, संघटक जावेद शेख, सह संघटक रमेश खेमनर, सदस्य उमेश बाचकर, प्रमोद डफळ इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अनेक वेठबिगार कामगारांची सुटका केली होती, तसेच गुन्हेगारांवर वचक बसवत गुन्हेगारीला आळा घालण्यात त्यांना यश आले होते, त्याच पद्धतीने राहुरी तालुक्यात पदभार घेताच त्यानीं सराईत गुन्हेगारांना गावठी कट्टा, जिवंत काडतूस व गांजा विक्री करणारे दोघेजण शीताफिने ताब्यात घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. तसेच शांतता प्रिय असलेला राहुरी तालुका अनेक कारणामुळे अशांतता झाल्यामुळे तालुका पूर्वीसारखा शांतता करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!