प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे राहत असलेल्या नानाभाऊ बाजीराव आंबेकर वय ३२ वर्ष हे चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे ताहाराबाद सब स्टेशन अंतर्गत काम पाहतात. दोंदे डीपी वरील जंप जोडला नाही म्हणून आंबेकर या महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराला चार जणांनी मिळून लाकडी दांडा आणि लाथा बुक्यानी बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी घडली आहे.
नानाभाऊ आंबेकर हे ताहाराबाद सबस्टेशनं अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीला आहे. शेरी चिखलठाण, दरडगांव थडी, तास,हे गाव असून त्या ठिकाणी विदयुत लाइन दुरुस्ती करणे आणि वीज बिल वसुली करण्याचे काम आंबेकर करतात. दि.१७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी आरोपी हर्षद भाऊसाहेब बाचकर याने नानाभाऊ आंबेकर यांना फोन करून दरडगाव येथील दोंदे डी. पी. चा जम्प तुटलेला आहे तो जम्प जोडून द्या असे सांगितले असता आंबेकर म्हणाले की मी राहुरी फॅक्टरी येथे मिटिंगसाठी जाणार असून तो जम्प मिटिंग वरून आल्यावर दुपारी जोडून देतो असे सांगितले.
दुपारी ३ च्या दरम्यान आंबेकर हे मिटिंग करून दरडगाव थडी मोटार सायकल वरून जात असताना दरडगांव फाटा चौकात गाडी थांबून आरोपीनी आंबेकर यांना मारहाण करून दोंदे डीपी वरील जम्प जोडून घेतला आणि झालेला प्रकार कुणाला न सांगता गप्प बस असे धमकावले.
Leave a reply