नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे १९ जानेवारी २०२४ रोजी श्री नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठानच्या वतीने श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा ,बलिदानी कारसेवक अभिवादन, राज्यस्तरीय श्री नरेंद्र देवेंद्र पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विविध क्षेत्रातील आदर्श संस्था, समाजसेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती यांचा पुरस्कार देऊन गौरव सोहळा आई लॉन्स जातेगाव या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी नांदगाव तालुक्यातील आर एस ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा, समाजसेविका सौ. रेखाताई अशोक शेलार यांना केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते, आमदार सुहास अण्णा कांदे, श्री नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, सागर फाटे, पंकज खताळ, उमेश उगले, राजू पवार,सह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील पत्रकार बांधव, नागरीक, प्रतिष्ठानचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री नरेंद्र देवेंद्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Leave a reply