Disha Shakti

सामाजिक

टाकळीढोकश्वर येथे प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : टाकळीढोकश्वर येथिल हनुमान मंदिरात सोमवारी (दि.22 जानेवारी) अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. श्रीराम जय राम जय जय रामच्या! घोषाणे मंदिर परिसर दणाणला. भक्ती वातावरणाने राममय झालेल्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हनुमान मंदिर सेवा समिती व टाकळी ढोकश्वर ग्रामस्थांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी हनुमान चालिसाचे पठण व रामनामाचा जप पार पडला. टाकळी ढोकश्वर येथील विद्यालयातील विद्यार्थी कलाकारांनी सहभागी झाले होते. कार्यक्रमात लहान बालके देखील श्रीरामच्या वेशभुषेत उपस्थित होते. राम आएंगे…, मेरी झोपडी के भाग खुल गए…, सिया राम जय राम… आदी गीतांनी वातावरण प्रफुल्लीत झाले होते. तर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

अयोध्या येथे राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा लाईव्ह सोहळा पाहण्यासाठी भाविकांना मोठ्या स्क्रिनवर व्यवस्था करण्यात आली होती. अयोध्येतील मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामच्या मुर्तीचे दर्शन होताच उपस्थित भाविकांनी जय श्रीरामचा एकच गजर केला. या सोहळ्यास टाकळीढोकश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!