प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील विविध जातीधर्माच्या लोकांनी आणि सकल हिंदू समाजातील बंधू भगिनींनी एकत्रित येत जय श्री राम, भारत माता की जय, अशा घोषणा देत शेरी चिखलठाण पंचक्रोशीतील भाग भगवेमय करत जल्लोष, आनंदी वातावरणात कार्यक्रम साजरा केला.येथील मुस्लिम बांधवानी स्वयंस्पुर्तीने चिकन, मटण दुकानें बंद ठेऊन श्रीराम प्राण प्रतिष्ठापने निमित्त विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
आयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा साठी शेरी चिखलठाण येथे प्रामुख्याने भगवे झेंडे, पताका, पारंपरिक वेष, कुर्ते, टोपी,भगवे गणवेश करून सकाळी ८. ते १० च्या सुमारास हनुमान चालीसा व भव्य मोटार सायकल रैली काढण्यात आली. या रैलीत अनेक हिंदू व बहुजन समाजातील युवक तरुण मोटार सायकल वरून झेंडे हाती घेत जय श्री राम च्या घोषणा देत आयोध्येतील राम लल्लाचा आनंद साजरा केला.
यावेळी संजय काकडे, बाळासाहेब काकडे, राजुमाळी, तुकाराम पिंपळे, भारत काळनर, संतोष शेठ काळनर, बाळासाहेब खेमनर, विठ्ठल तमनर, विजय बाचकर, आदिक डोलनर, दशरथ काळनर, वामन काळनर, फारुख शेख, रफीक शेख, शरद बागुल, बबलू काळनर, पत्रकार जमीर सय्यद, पत्रकार युनूस शेख, सागर काकडे, आपसो. काकडे, माऊली गायकवाड, पोपट बारवे सर, चांगदेव काकडे सर, राजेंद्र जगनाथ काकडे सर, रानपाटील बाचकर सर, राधाकिसन काकडे, साईनाथ काकडे, आबासाहेब काळनर, एकनाथ काकडे, अक्षय पेंडभाजे, बाळासाहेब भोसले, देवराम भोसले, अशोक भोसले, डोमाळे, तमनर, डोलनर, खेमनर, टुले, माने, बागुल, शेख, बर्डे, माळी, आदी महिला, भगिनीं, पुरुष आणि तरुण युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
सकाळी १० ते १२.३० च्या सुमारास संगीत भजन आयोजित करण्यात आले. दुपारी १ ते ३.३० च्या दरम्यान राम, सीता, लक्ष्मण, हनुमान वशिष्ठ ऋषीं, शबरी माता पात्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान रामायणचार्य ह.भ.प. सुनील महाराज सोनवणे यांचे प्रवचन पार पाडण्यात आले.६ ते ६.१५ वाजता श्री राम रक्षा स्रोत पारायण आणि ६.३० ते ९.०० वाजता महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करून श्री राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा चा कार्यक्रम सोहळा संपन्न करण्यात आला.
शेरी चिखलठाण येथे श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0Share
Leave a reply