प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा व पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा सौ. संगीताताई नाईकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 विभागाचे डी सी बी शिवाजीराव पवार साहेब यांची भेट घेतली. तसेच चाकण आणि चाकणच्या परिसरातील तृतीय पंथी समाजाच्या समस्या व अडचणी छावा संघटनेच्या माध्यमातून डॉ.शिवाजीराव पवार यांच्या समोर मांडण्यात आल्या. छावा संघटनेच्या वतीने डॉ.पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तृतीय पंथी समाजाचे खूप सदस्य उपस्थित होते. या सर्व समस्या स्वतः लक्ष घालून सोडवण्यात येतील असा विश्वास यावेळी बोलताना डाॅ.पवार साहेबांनी दिला.
यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा व पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा सौ. संगीताताई नाईकरे पाटील, शन्नो ताई छावा शेख संघटनेच्या अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा, सौ. आशाताई फडके -देशमुख अध्यक्षा छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा व पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र प्रदेश, शहा आलम बेग अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सौ.महानंदाताई चव्हाण छावा संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्षा व पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस, सौ. सुधाताई आगरकर खेड तालुका उपाध्यक्षा, सौ.ज्योतीताई खंडाळे खेड तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री विजयभाऊ कांबळे या सर्व सन्माननीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने तृतीय पंथी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत पोलीस उपायुक्तांना निवेदन

0Share
Leave a reply