राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामस्थांनी व शालेय समितीच्या सदस्यांनी पाठ फिरवली असून या कार्यक्रमात फक्त ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी व लोक प्रतिनिधिंचे पती व्यतिरिक्त शालेय समितीचे अध्यक्ष व ठरविक सदस्य व्यतिरिक्त उर्वरित शालेय समितीच्या सदस्यांनीही नेहमी प्रमाणे पाठ फिरवली असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
आज 26 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे स्टेजवर लोकप्रतिनिधी व त्याचें पती स्टेज काबीज केल्याने नेहमीप्रमाणे शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात तेच तेच प्रमुख मान्यवर असतात त्यामुळे ही शाळा राजकारणामुळे भरडली जात असून यावर नक्कीच विचार करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
26 जानेवरी व 15 ऑगस्ट या कार्यक्रमास गावतील नागरीकांना यापूर्वी शाळेच्या माध्यमातून राजकीय आजी- माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील ग्रामस्थांना शाळेच्या माध्यमातून पत्र अथवा मॅसेज मेसेज द्वारे आमंत्रित करण्यात यायचे परंतु सद्या या शाळेत सर्व महिला महिला शिक्षिका असल्या कारणाने या शाळेचे सर्व सूत्र लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चालत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
26 जानेवरी व 15 ऑगस्ट या कार्यक्रमास शाळेत समितीचे सदस्य व ग्रामस्थ पाठ फिरवली असून या राजकीय मतभेदातून या कार्यक्रमास नागरिक पाठ फिरवत असल्याने मागील दोन वर्षात शाळेत वाढते राजकीय हस्तक्षेपामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शाळेसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हे धोकादायक असून यावर नक्कीच विचार होण्याची गरज आहे अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताकदिनी राजकीय मतभेदांमुळे शालेय समिती सदस्य व ग्रामस्थांनी फिरवली पाठ

0Share
Leave a reply