विशेष प्रतिनिधी / किशोर खामगळ : दि.२६ जानेवारी रोजी श्री. क्षेत्र धामणखेल, ता. जुन्नर, जि. पुणे येथील न्यु इंग्लिश स्कूल धामणखेल या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि पालक यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून झेप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मा.श्री.सिद्धांत बोचरे त्यांचे समवेत संस्थेचे सदस्य श्री.समीर हुंडारे,श्री.संतोष जाधव आणि निखिल डुकरे हेदेखील उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून संस्थेचे प्रतिनिधी सिद्धांत बोचरे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आजच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणखेल या शाळेसाठी झेप प्रतिष्ठानच्या वतीने दोन संगणक संच भेट देण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावातील विविध संस्थांच्या वतीने या दातृत्वाबद्दल झेप प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले.याकरिता मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार.
धामणखेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला झेप प्रतिष्ठानच्या वतीने दोन संगणक संच भेट

0Share
Leave a reply