वैजापूर प्रतिनिधी / नितीन पाटुळे : दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूर वस्ती, परसोडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिना विषयीची मनोगते व उपस्थित महिला भगिनींचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष कजबे व परसोडा ग्रामपंचायत सदस्य निलेश परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
परसोडा केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्याम भाऊ राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना आज प्रजासत्ताक दिना दिवशी उपस्थित सर्व पालकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब डुकरे, विठ्ठल सुलाने, दत्तात्रेय गाढे, सुरेश गाडे, अतुल डुकरे, राजू महेर, सचिन नागलोत, अखिल शेख, संतोष खिल्लारे, काकासाहेब निकम, संतोष दिवटे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका रोहिणी जारवाल तसेच वस्तीवरील ज्येष्ठ नागरिक व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. जाधव सतीश सर यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार श्रीमती काकरवाल मॅडम यांनी मानले.
Leave a reply