प्रतिनिधी /शेख युनूस : चिखलठाण येथील आदिवासी कुटुंबातील गं. भा. अलका हरिभाऊ केदार यांचे राहते घराची भिंत कोसळून मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे.सविस्तर माहिती अशी की, चिखलठाण तेथे केदार कुटुंब हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. अलका केदार ही आदिवासी कुटुंबातील महिला ही विधवा आहे, ती मोल मजुरी करून जीवन जगत आहे. दिनांक.२८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ११.४५ वाजता ह्या महिलेचे घराची. भिंत अचानक कोसळून जीवित हानी टळून आर्थिक नुकसान झाले आहे.
अलका केदार तिचा मुलगा सुनील केदार, सून पूजा केदार आणि दोन लहान बालके या घरामध्ये राहत असून ते दुपारी शेती कामासाठी बाहेर गेले असता भिंत अचानक पडून या गरीब दुबल्या कुटूंबाचे मोठे नुकसान झाले असून या कुटुंबाला एक मदत म्हणून घरकुल मिळावे, जेणे करून दोन छोटे बालके आणि कुटुंबातील सदस्य यांना राहण्यासाठी छत्र मिळेल,अशी अपेक्षा या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. गरीब, अनाथ, विधवा आदी गोष्टी लक्षात घेता या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या आदिवासी कुटुंबानी केली आहे.
Leave a reply