मुंबई कांदिवली दिशाशक्ती नेटवर्क : मुंबई मधील कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय टीएमजी कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे निवडपत्र परिषदेच्या सहसंस्थापिका सौ.सलमा एन.खान, व डॉ.शैलेश पवार प्रमुख समन्वय यांनी भारत कवितके यांना दिले आहे.
भारत कवितके यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन,२रा मजला, आझाद मैदान शेजारी, महापालिका मार्ग, सी.एस.एस.टी.मुंब ई, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकारिता, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल भारत कवितके यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.या वर्षी चा हा भारत कवितके यांना मिळणारा पहिला पुरस्कार आहे.
झुंजार धनगर समाज संस्थेचे कार्य अध्यक्ष,जय महाराष्ट्र सेवा मंडळाचे अध्यक्ष व संस्थापक, श्री सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव, सार्वजनिक सेवा समिती चाळ चे महासचिव, भाजपचे भटक्या विमुक्त आघाडी चे कांदिवली चारकोप विधानसभा अध्यक्ष वैगरे वैगरे पदावर भारत कवितके कार्यरत आहेत.
भारत कवितके यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय टीएमजी कार्यगौरव पुरस्कार जाहीर

0Share
Leave a reply