Disha Shakti

Uncategorized

श्रीगोंदा तालुक्यातील मुक्कामी असणाऱ्या बंद केल्याने एस टी बसेस त्वरित चालू करण्याची वंचित बहुजन आघाडी मागणी

Spread the love

श्रीगोंदा प्रतिनिधी / राहुल कोठारे  : महाराष्ट्र आगार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी बंद केलेल्या एस बस सुरू करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे वतीने निवेदन दिले व तसेच जर बसेस सुरू केले नाही तर कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ यांना देण्यात आले आहेत. बंद केलेल्या बसेस तात्काळ सुरू करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबतचे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड,युवा उपाध्यक्ष सचिन घोडके, ऍडव्होकेट रमेश जठार तालुका सचिव प्रमोद उजगरे, जिल्हा सचिव आबासाहेब रामफळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भिवसने वैभव सोनवणे नितीन जावळे भीमराव घोडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा-सारोळा, श्रीगोंदा – पेडगाव, श्रीगोंदा-अजनूज या ठिकाणच्या एस टी बसेस बंद केल्याने शिक्षणाचे व काम धंदाचे नुकसान होत आहे.

सदर निवेदनात सहानुभूतीचा विचार करून सदर बसेस त्वरित सुरू करण्यात यावेत. नाहीतर नाविलाज कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीत दिलेले आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके, ऍडव्होकेट रमेश जठार, तालुका सचिव प्रमोद उजगरे, जिल्हा सचिव आबासाहेब रामफळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भिवसने, वैभव सोनवणे, नितीन जावळे, भीमराव घोडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!