बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार (कासराळीकर) : बिलोली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कासराळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता संभाजी टोम्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा करण्यात आला.
कासराळी ग्रामपंचायीच्या सरपंच शेषराव लंके यांनी ठरल्या प्रमाणे अडीच वर्ष कार्यकाळानंतर सरपंच पदाचा राजीना दिला होता.त्यांचा राजीन्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंच पदासाठी कविता टोम्पे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकार उडतीले यांनी कविता टोम्पे बिनविरोध निवड जाहीर केली.
त्यावेळी ग्रामपंचायत कासराळीचे ढालकरी मॅडम, कासराळी नगरीचे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, माजी उपसरपंच सोमलिंग पाटील,माजी सरपंच शेषराव लंके, दत्तु पा.नरंगले, किशनराव म्हेत्रे माजी ग्रा.प.सदस्य, सुभाष पाटील शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष,शंकर गंगुलवार सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार शेख युनूस,पत्रकार दादाराव इंगळे,कल्पना माधव दंतापल्ले उपसरपंच, शिवलिला बसवंत पाटील कासराळीकर माजी उपसरपंच, व्दारका ओमप्रकाश गंगुलवार ग्रा.पं.सदस्य, साईनाथ गंगुलवार ग्रा.पं.सदस्य,बासीद कुरेशी ग्रा.प.सदस्य, संजय ठक्करवाड, संभाजी टोम्पे, परमेश्वर गजलोड, संग्राम इजुलकंठे, मोहन इंगळे, व्यंकट इंगळे भिमराव इंगळे,गंगाधर गुरूंदे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येनी उपस्थित होते.
Leave a reply