विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन ३० जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
पारनेर तालुक्यातील मौजे कासारे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी यांनी कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. तर दप्तर अद्यावत ठेवण्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली होती. ग्रामसभा, मासिक मीटिंग घेण्यात आलेले नसून, पाझर तलाव क्रमांक १ च्या लिलावाची रक्कम आज अखेर ग्रामपंचायत खात्यावर भरणा केली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला होता.
संघटनेच्या तक्रारीनुसार पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांनी ग्रामपंचायत कासारे (ता. पारनेर) ग्रामविकास अधिकारी पी. एस. डेरे यांच्या विरुद्धच्या तक्रार अहवालात त्रुटी ठेवल्या आहेत. तक्रार अर्जातील मुद्यांनुसार चौकशी केली असता संबंधीत ग्रामविकास अधिकारी हे अंशतः दोषी आढळून आले असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जि.प.जि.से. (शिस्त व अपील)१९६४ च्या कलम ४(२) च्या अनुषंगाने ग्रामपंचायत कासारेचे ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
गट विकास अधिकारी पारनेर पंचायत समिती यांच्या चौकशी नंतर कासारे ग्रामपंचायतचे ‘मन माणी’ ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पापाचा घडा भरल्याचा व लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या समितीच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुका अध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी म्हटले आहे.
अखेर कासारेच्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश !

0Share
Leave a reply