Disha Shakti

सामाजिक

परिवर्तन संस्थेच्या वतीने एकल,विधवा,परित्यक्ता महिलांची अहमदपुरात उद्योजकता कार्यशाळा संपन्न

Spread the love

अहमदपुर प्रतिनिधी / नंदराज पोले : पती निधनानंतर विधवा झालेल्या किंवा पतिपासून विभक्त रहाणाऱ्या एकल महिलांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा इतरांच्या शेतात रोजगार करण्यापेक्षा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय कसा उभारता येईल त्याकरिता परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे अश्वासन परिवर्तन संस्थेच्या वतीने अहमदपुरात पार पडलेल्या एकल,विधवा,परित्यक्ता महिलांच्या उद्योजकता कार्यशाळेत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना दिले.अहमदपुर येथील परिवर्तन संस्थेच्या सभागृहात एकल, विधवा,परित्यक्ता महिलांची तालुका स्तरीय एक दिवशीय उद्योजकता कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव बालाजी शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनविकास संस्थेचे नागनाथ चव्हाण,विष्णु आचार्य उपस्थित होते.यंत्राच्या माध्यमातुन होत असलेली शेतीची व सरकारी कामे यामुळे मजुरांचा रोजगार दिवसेदिवस कमी होताना दिसत आहे.इतर मजुरां बरोबरच एकल, विधवा,परित्यक्ता महिलांच्या ही हाताला काम मिळत नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वतः बरोबर कुंटूबांची होणारी फरफट थांबावी याकरिता एकल, विधवा, परित्यक्ता महिलांनी दुसरीकडे रोजगार शोधण्या पेक्षा दुग्ध व्यवसाय, कुकूट पालन,गोट फॉर्म,ब्युटी पार्लर, किराणा दुकान,मिरची कांडप, पापड, मसाले, लोनचे असे घरगुती छोटा मोठे उद्योग सुरू करून कुंटूबाचा उदरनिर्वाह चालविली जाऊ शकते या करिता परिवर्तन संस्थेच्या पुढाकारातून शासकिय योजना मिळवून देवून मदत करणार असल्याचे बालाजी शिंदे म्हणाले तर नागनाथ चव्हाण आणि विष्णु आचार्य यांनीही उपस्थित महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे येण्याचे अवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश शिंदे यांनी केले यावेळी ,वैजनाथ मुसळे,ललिता खलसे, छबुबाई शिंदे,भागवत खलसे,सह तालुक्यातील एकल, विधवा, परित्यक्ता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!