दिशाशक्ती प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : श्री क्षेत्र वरखेड (ता. नेवासा) येथील गोदावरी तिरी गंगामाईची महाराष्ट्र राज्य पोतराज सेनेच्या वतीने स्वच्छाता अभियान राबण्यात आले गोदावरी तिरी गंगामाईच्या नदी पात्रामध्ये अनेक प्रकारचे पोतराज जोगतीन नदी पात्रामध्ये स्नान करण्यासाठी येतात तसेच नदी पात्रामध्ये अनेक प्रकारचे कपडे टाचण्या खिळे बाहुल्या नारळ जुने फोटो कोरडा साट असे प्रकारचे साहित्य टाकल्याने नदी पात्र अस्वच्छतेने भरलेले असल्याने महाराष्ट राज्य पोतराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कणगरे व मार्गदर्शक बबन वाघचौरे यांनी संघटनेची बैठक घेवुन हा विषय मांडला व निर्णय घेण्यात आले की श्रीक्षेत्र वरखेड येथिल गोदावरी तिरी गंगामाईची स्वच्छता करावयाचे. तो निर्णय घेण्यात आले.
रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी पुर्णदिवशी श्री क्षेत्र वरखेड गोदावरी तिरी गंगामाईची स्वच्छता अभियान करण्यात आली यावेळी महाराष्ट राज्य पोतराज सेनेचे जिल्हा संघटक देविदास वैरागर, राहुरी शहर अध्यक्ष सुरेश जगधने, राहुरी तालुका अध्यक्ष नवनाथ भाग्यवंत, नेवासा तालुका उपध्यक्ष राजेंद्र वैरागर, महाराष्ट राज्य पोतराज सेनेचे प्रसिध्दी प्रमुख दतात्रय जोगदंड, निर्मला ससाणे, भानुदास ससाणे, अलका वैरागर, विकास साठे, कचरु उबाळे, सुभाष ठोकळ, राजेंद्र गोसावी, अनिल सकट, आकाश भारस्कर, शुभम लोणके, ग्रिधार वडागळे, हौसाबाई मुंजग, साहील वाल्हेकर, ओमकार कणगरे, देविदास शिरसाठ, कडुबाळ गोरे आदी संघटनेचे पदाअधीकारी स्वच्छतेमध्ये सहभागी झाले होते.
Leave a reply