Disha Shakti

Uncategorized

टाकळीढोकश्वर येथिल ओम काॅम्प्युटर्स संस्थेने सारथी संस्थेची ग्रामसभेतून केली जनजागृती

Spread the love

विशेष प्रतिनिधी /वसंत रांधवण (पारनेर) : टाकळीढोकश्वर येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या टाकळीढोकश्वरसह तिखोल,काकनेवाडी, वडगाव सावताळ, वासुंदे, कर्जुले हर्या,कारेगाव, सावरगाव,पळसपूर, पोखरी या गावच्या ग्रामसभेमध्ये टाकळीढोकश्वर येथिल ओम काॅम्प्युटर्स या केंद्रातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सारथी व एमकेसीएल या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेमार्फत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. याविषयी माहिती देण्यात आली. 

हा कोर्स १८ ते ४५ या वयोगटातील मुला – मुलींना पूर्णपणे मोफत असून त्यामध्ये चार माॅडूल्स आहेत साॅफ्ट स्किल,आय टी,टॅली, अकाउंटिंग वेब डिझायनिंग, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, हार्डवेअर नेटवर्किंग अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या जनजागृती करण्यासाठी सारथी योजनेचे लाभार्थी प्रतीक जपे, अक्षय रोकडे,रोहन झावरे,कु. मयुरी काकडे, सृष्टी वाळुंज, अंकिता वाळुंज, वैष्णवी झावरे, सुवर्णा ढुस, दिक्षा झावरे, प्रतीक्षा ठाणगे, शुभांगी गोडसे,चंदना गोडसे, ऋतुजा आंधळे, अपेक्षा चेमटे, किशोर औटी, दर्शन ढोकरे, सुजित शिकारे, सोनाली शेळके, माधुरी घुले, यश गागरे या विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात जनजागृती केली. व वरील गावातील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी त्यांना मदत केली आहे.

 या योजनांविषयी आपल्या जवळील मुला- मुलींना याबद्दल माहिती द्यावी व सारथी च्या सर्व योजनांविषयी माहिती आणि त्याबद्दलची आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया इत्यादी विषयी अधिकची माहिती मिळवण्यासाठी टाकळी ढोकश्वर येथिल ओम काॅम्प्युटर्स येथे संपर्क करून किंवा समक्ष भेटून माहिती घ्यावी, असे आवाहन संचालक बापूसाहेब रांधवण यांनी केaली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!