Disha Shakti

Uncategorized

डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : दि.२. फेब्रुवारी२०२४ रोजी, भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र काळेश्वर येथे महाआरती, रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, व अन्नदान आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळी १०.०० वाजता विष्णुपुरी येथिल भगवान श्री काळेश्वराचे दर्शन व आरती, सकाळी १०.३० वाजता डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, सकाळी ११.०० वाजता सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इंटरनशनल स्कूल च्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल. यानंतर सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरचे सकाळी ११.३० वाजता आयोजन , यानंतर सकाळी ११.३० वाजता पासून सहयोग कॅम्पस विष्णुपुरी शुभेच्छाचा स्विकार करणार आहेत. सायंकाळी ०७.३० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील रुग्णांच्या नातेवाईकांना डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण व सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!