विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी मानोरी येथील वकील दांम्पत्य अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे राहुरी न्यायालयीन परिसरातून अपहरण करून डांबून ठेऊन पाच ते सहा तास छळ करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करत श्रीरामपूर वकील संघाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणास भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. तसेच वकील हा देशातील महत्वाचा घटक आहे. ही हत्या फक्त दोन वकिलांची नाही तर लोकशाहीची आहे.वकिलांना सुरक्षेची गरज आहे.
त्यामुळे The Advocate Protection Act हा कायदा सरकारने पारित करून त्याची अंमलबजावणी करावी, जेणेकरून वकिलांना सुरक्षा कवच प्रदान होईल,यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू असे वक्तव्य यावेळी पाठिंबा देत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, विद्यार्थी नेते पँथर ऋषी पोळ यांनी केले.यावेळी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष साजिद भाई शेख उपस्थित होते.
Leave a reply