Disha Shakti

इतर

सत्यशोधक लहुजी क्रांती सेना भविष्यात मोठी सामाजिक क्रांती घडविणार भगवान जगताप यांचे प्रतिपादन….

Spread the love

राहुरी प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सुरशे : सत्यशोधक लहुजी क्रांती सेना राज्यव्यापी सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन राहुरी शहरातील साई लॉन्स या ठीकाणी अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव जगताप हे होते. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुरी तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार बांधव यांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार असलेले आर आर जाधव अहमदनगर शहरातील ऍक्टिव्ह न्यूजचे उमेश साठे कोल्हार येथील एस आर बी न्यूज चे संतोष बोरुडे राहुरी येथील सी न्यूज चे मनोज साळवे मनीष पटेकर सचिन पवार या पत्रकार बांधवांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले भगवान जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्यशोधक लहुजी क्रांती सेना ही सामाजिक संघटना एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांचे कामाची पद्धत बघता भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये मोठी सामाजिक क्रांती घडविणार या कार्यक्रमाला उपस्थित अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
कार्यक्रम प्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने
यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सत्यशोधक लहुजी क्रांती सेना ही एक वैचारिक पातळीवर काम करणारी सामाजिक संघटना आहे.

महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करणारी संघटना अशी संघटनेचे ओळख असणार आहे
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जोपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सत्यशोधक लहुजी क्रांती सेना रस्त्यावरची चळवळ उभी करून ऊग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे यांनी समोर उपस्थित असलेल्या समाज बांधवांना कळकळीची विनंती केली की आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे उलटून गेली आहे तरी देखील या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जाती एक संघ होऊन आपल्या समाजाच्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे परंतु अनुसूचित जातीमध्ये नंबर दोनची असलेली मातंग समाज आज देखील अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहे याचे कारण देखील आपण शोधले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेमध्ये येऊन समाजाचे हित व एकी जपावी.

भविष्यात सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या नेतृत्व खाली संपूर्ण समाज एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही
असा मी आपल्याला शब्द देतो
त्याचप्रमाणे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दीपक भाऊ आव्हाड यांनी आपल्या मनोगत मध्ये आज खऱ्या अर्थाने मातंग समाजाला जर कशाची गरज असेल तर ती फक्त शिक्षण आणि शिक्षण यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजासह उपेक्षित जाती घटकातील सर्व समाज बांधवांनी शिक्षणाची कास हाती धरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून कृती करावी

संघटनेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समता दूत सामाजिक न्याय भवन बार्टी अंतर्गत असलेले एजाज पीरजादे सर असलेले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गंगाधर सांगळे ते देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित शिर्डी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश भाऊ त्रिभुवन संगमनेर येथील ज्ञानेश्वरजी राक्षे साहेब महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार कर्ते प्रा ना म साठे सर,मंजाबापू साळवे, अ नगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल शेकटकर साहेब,कोपरगाव येथील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष फकीरा भाऊ चंदनशिव राहुरी शहरातील माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने कोल्हार गावचे प्राध्यापक काळूराम बोरुडे सर सामाजिक कार्यकर्ते अरुण बोरुडे,पत्रकार संतोष बोरुडे, राजाभाऊ बागुल, विलास कदम, विजय पाथरे, राजेंद्र आव्हाड, दत्ता भाऊ लाहुंडे, लहू खंडागळे, भागचंद नवगीरे लहुजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष जगधने, पोपट सरोदे, राजेंद्र त्रिभुवन, बाळासाहेब गायकवाड सर, बाबासाहेब शिंदे, नामदेव कांबळे, उमेश साठे व महीला सौ अलका दोडके यांनी समाज बांधवांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी कोल्हार येथील सुनील बोरुडे यांची राज्य प्रवक्तेपदी तर पिंपरी अवघड येथील सुरेश जगधने यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थिनी सध्या m.a b.Ed चे शिक्षण घेत असलेले कुमारी स्नेहा कांतीलाल जगधने व सौभाग्यवती रेणुका दीपक आव्हाड यांचा देखील संघटनेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रम 
यशस्वी करण्यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे सर्व तालुका व शहर युनिटमधील कार्यकर्ते यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

यामध्ये प्रामुख्याने राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने, तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, तालुका संघटक संदीप जगधने, प्रसिद्धीप्रमुख आकाश बोरुडे, शहराधक्ष विलास जगधने व कोर कमिटी सदस्य किशोर वैरागर, रवि वैरागर,सोमनाथ जगधने, विलास बोरुडे, प्रवीण ठोंबरे रवींद्र कांबळे सतिष बोरुडे यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी सूत्रसंचालन राज्य प्रवक्ते निलेश मछिंद्र जगधने यांनी केले तर आभार पत्रकार मनोज हासे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!