प्रतिनिधी / जितू शिंदे : नगर – पाथर्डी रस्त्यालगतच्या भिंगारमध्ये आज (दि. २) सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्यावरचे खड्डे हुकविण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात शहापूर ग्रामपंचायतचे सरपंच बापू बेरड यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित अभियंताला निलंबित करावं, अशी मागणी अहमदनगरचे सिध्दाराम सालीमठ जिल्हाधिकारी यांना उद्देशून केली आहे.
अहमदनगरहून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. भिंगारच्या बेलेश्वर मंदिराच्या चौकातही या खड्ड्यांमुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. भिंगार झाल्याच्या पुलावर संबंधित विभागाने एक छोटासा डांबरी पट्टा मारला आहे. रस्त्यावरचे खड्डे हुकविण्यासाठी वाहन चालक या डांबरी पट्ट्यावरुन ये – जा करत असल्यामुळेदेखील अपघात होत आहेत.
अतिशय नियोजन शून्य काम करणाऱ्या या विभागाचा कारभार अपघातांना कारणीभूत ठरत आहे. वास्तविक पाहता रस्त्यावरचे खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नातच शहापूर ग्रामपंचायतचे सरपंच बेरड यांना मृत्युला सामोरं जावं लागलंय. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेकांवर अशी वेळ आली आहे. सुदैवाने यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र आजच्या अपघातात सरपंच बेरड यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नगर पाथर्डी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा झाला. आहे. या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला तात्काळ देण्यात यावेत. अन्यथा भविष्यात अनेकांचा बळी जाऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
भिंगारमध्ये भीषण अपघात; माजी सरपंचाचा मृत्यू ; कलेक्टर साहेब! अभियंताला निलंबित करण्याची संतप्त नागरिकांची मागणी

0Share
Leave a reply