Disha Shakti

राजकीय

आज अहमदनगरमध्ये महाएल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळांसह अनेक नेते उपस्थित राहणार

Spread the love

वसंत रांधवण / (विशेष प्रतिनिधी अहमदनगर) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसींचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकवटून आणखी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहीलाच आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ३ फेब्रुवारीला नगरला होत आहे. त्यामध्ये लाखो लोकांना एकत्र आणून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. मेळाव्याला ओबीसींचे राष्ट्रीय नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे संयोजकांनी सभेच्या प्रवेशद्वाराला माजी केंद्रीय मंत्री कै. बबनराव ढाकणे यांचे नाव देऊन सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न केला आहे.

 मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
अहमदनगर नगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. ओबीसी नियोजन मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे,प्रा. लक्ष्मण गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी,पी. टी. चव्हाण, दौलतराव शितोळे,सत्संगजी मुंढे,प्रा. लक्ष्मण हाके हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

ओबीसींची पहिली भव्य सभा

संयोजन समितीतर्फे सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजातून मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून आरक्षण द्यावे ही भूमिका ओबीसी समाजाची आहे.काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट राज्य सरकारकडून जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींची पहिली भव्य सभा होणार आहे. या मेळाव्यात ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे. या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. या सभेसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरपोळ संस्थेचे मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, वायएमसी मैदान,खालकर हाॅस्पिटल जवळ, अहमदनगर बाॅईज हायस्कूल मैदान,कोठी रोड येथे करण्यात आलेली आहे. सभेच्या ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!